पनवेल (प्रतिनिधी):राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे. दरवर्षी नवीन १० ते १५ कंपन्यांतील कामगार महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारत आहेत. तळोजा MIDC तील मे. साफोर्ड या कंपनीतील कामगारांनी अस्तित्वात असलेल्या दोन संघटनांना रामराम ठोकून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.
संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष पि.एस.म्हात्रे, संघटक विजय दाभणे, निलेश कदम, संजीवन कांबळे, भगवान ढोंगरे, संदीप म्हात्रे, मारुती पाटील, प्रकाश फडके, दिलीप पोरजी,मोहन फडके, रोहन कोळी,अनिल ढोंगरे, साफोर्ड कंपनीतील कामगार प्रतिनिधी अभिजित पाटील, निलेश म्हात्रे, नारायण कडू, दीपक गोंधळी, मोहम्मद कमाल हुसेन, निर्दास ठोंबरे, राजेंद्र मुंडे, चेतन पाटील, अभिमन्यू पाटील, शरद फणसे, उमेश पाटील, घनश्याम म्हशीलकर, संदीप गमरे, अविनाश मांडरे आदी उपस्थित होते.
0 Comments