सीकेटी महाविद्यालयात लोगो डिझाईन आणि अतिथी व्याख्यान संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय(स्वायत्त) येथे विज्ञान संघटना यांच्या मार्फत 'जीवनशैलीतून तरुणांना आकार देणे' या विषयावर अतिथी व्याख्यान व तंत्रज्ञानाशी सुरक्षित विज्ञान व हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, जीवनासाठी एआय या विषयावर लोगो डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालायचे प्रा. डॉ. संतोष पी. सुपनेकर हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.एम.ए.म्हात्रे व विज्ञान संघटनेच्या प्रमुख प्रा. डॉ. वाय. एस. मुनीव यांनी उपस्थिती दर्शविली.त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान प्रा. एम. डी. वैशंपायन यांनी प्रमुख पाहुणे डॉ. संतोष पी. सुपनेकर यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संतोष पी. सुपनेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना जनरेशन- झेड चा तुमच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम तसेच पारंपारिक आणि आधुनिक अन्नाचा आरोग्यवर काय परिणाम होतो. त्याचबरोबर सोशल मीडियाचा जनरेशन- झेडवर होणारा दुष्परिणाम या विषयी माहिती दिली. तसेच तुम्ही मार्केटिंग आणि उद्योजकतेसाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता असे विद्यार्थ्यांना उपदेश केला . या कार्यक्रमामध्ये १२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी कु. साक्षी धनावडे आणि कु. श्रेया जोशी यांनी केले. तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. एस. डी. चांडवेकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.


Post a Comment

0 Comments