पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील गुणवंत शिक्षकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. क्लब सीपीसी सुलभा निंबाळकर यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी 'गुड टच बॅड टच' या विषयावर मार्गदर्शन केले तसेच या विद्यालयातील चित्रकला विषयाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आ. बाठीया विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि तज्ञ चित्रकला मार्गदर्शक बी. यु. महाजन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. के. तिरमले यांनी प्रास्ताविक करून क्लब प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर ट्रेजरर अवंतिका मारुलकर आणि सी. पी. सी. सुलभा निंबाळकर यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी या सर्वांचे प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर यांनी आभार मानले.
0 Comments