प्रतिनिधी/ (प्रेरणा गावंड): शिवसेना उरण विधानसभा उपजिल्हा प्रमुख विनोद सदाशिव साबळे यांच्या पुढाकाराने करंजाडे येथे प्रथमच नवरात्र उत्सवाचे आयोजन उत्साहात पार पडले. या उत्सवाला परिसरातील नागरिक व महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष दांडिया रास, पारंपरिक खेळ तसेच पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमात रंगत आणली. या उपक्रमामुळे केवळ धार्मिक वातावरण नव्हे तर सांस्कृतिक उत्साह आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.
या प्रसंगी बोलताना विनोद साबळे म्हणाले, दुर्गा ही स्त्रीशक्तीचे प्रतीक असून प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचे रूप आहे. त्यामुळे तिचा सन्मान व आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. नवरात्र म्हणजे धार्मिकता, सामाजिक ऐक्य व महिलांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. शिवसेना उरण उपजिल्हा प्रमुख म्हणून विनोद साबळे यांनी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, लोकांशी सतत संवाद साधत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक सलोखा, महिलांचा सहभाग आणि सांस्कृतिक वारशाचे जतन या गोष्टींवर त्यांचा नेहमीच भर असतो. त्यामुळेच करंजाडेतील नवरात्र उत्सव हा त्यांचा सामाजिक जाणीवेचा व सांस्कृतिक परंपरेचा भाग ठरला.स्थानिक तरुणाई व महिला मंडळांनीही उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले.
0 Comments