प्रतिनिधी/ प्रेरणा गावंड : पनवेल परिसरात मतदार याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, विद्यमान नावे दुरुस्त करणे, तपशील सुधारणा तसेच स्थलांतरामुळे बदललेला पत्ता नोंदविणे यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नवीन नाव समाविष्ट करणे, अर्ज क्रमांक ७ द्वारे मतदार यामधील नाव दुरुस्ती, अर्ज क्रमांक ८ द्वारे तपशील सुधारणा, तर अर्ज क्रमांक ८अ द्वारे स्थलांतरामुळे झालेला पत्ता बदल करता येणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये लाईट बिल, घरपट्टी, रेशनकार्ड, भाडेकरार (यापैकी कोणतेही एक), आधारकार्ड, पॅनकार्ड, शासकीय ओळखपत्र तसेच इतर वैध कागदपत्रांसह दोन फोटो सादर करणे आवश्यक आहे. ही मोहीम मा.नगरसेवक हरेश म.केणी , खारघर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विश्वनाथ चौधरी आणि अध्यक्ष, पनवेल जिल्हा महानगरपालिका शहरी काँग्रेस कमिटी, काँग्रेस पक्ष नौफिल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९८२११६१६१५ किंवा ९०७६४४४४०४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments