गुळसुंदे गावातील अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा उत्सवाचे १६ वे वर्ष असून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळ-संध्याकाळ आरती, तसेच सांस्कृतिक उपक्रमांमुळे वातावरणात उत्साहाचे व भक्तिरसाचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळत आहे.उत्सवाच्या काळात गरबा-दांडिया, विविध स्पर्धा, विशेष कार्यक्रम, तसेच मुलांसाठी उपक्रम अशा अनेक आकर्षणांची रेलचेल आहे. गावातील नागरिकांसह परिसरातील भाविकही या उत्सवात सहभागी होत असून गुळसुंदे गाव भक्तीमय वातावरणाने नटले आहे. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा उत्सव यशस्वी आणि उत्साहात साजरा करण्यासाठी महिला वर्ग परिश्रम घेत आहेत
0 Comments