रविवारी पनवेलमध्ये "नमो युवा रन" चे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल मधील वडाळे तलाव येथे 'स्वस्थ आणि नशा मुक्त भारताच्या निर्मितीसाठी' या शीर्षकाखाली "नमो युवा रन" चे आयोजन करण्यात आले आहे. या रनचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, एड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पश्चिम मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, उरण शहर अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड, खालापूर पश्चिम अध्यक्ष प्रवीण मोरे, खालापूर पूर्व अध्यक्ष सनी यादव, कर्जत शहर अध्यक्ष राजेश लाड, नेरळ मंडल अध्यक्ष नरेश मसणे, कर्जत ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

Post a Comment

0 Comments