आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर!

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त "आरोग्याचा महायज्ञ" या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २० मार्च ते २९ मार्च २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आगरी समाज हॉल, मोहाचीवाडी, नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्ण तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व उपचार मार्गदर्शन दिले. तसेच मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत कार्ड E-KYC नोंदणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, जी २० मार्च २०२५ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे. अनेक रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आणि विविध वैद्यकीय सल्ल्यांचा लाभ घेतला.
यावेळी या आरोग्य शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून अंकुश दाभणे (तालुका सचिव), किसन शिंदे (संपर्कप्रमुख, नेरळ शहर), सुरेश राणे (पंचायत समिती विभाग प्रमुख, नेरळ), केतन पोद्दार (नेरळ शहर संघटक), आशुतोष गडकरी (उपशहर प्रमुख, नेरळ), पंढरीनाथ चंचे (उपशहर प्रमुख, नेरळ), जयवंत साळुंखे, विशाल साळुंखे, राहत खान, धनाजी डबरे, वर्षा बोराडे, सुनील पारधी, मंगेश मस्कर (तालुका प्रमुख, भाजप), पप्पू शेठ मसने, रवी शेठ मसने, नरेंद्र कराळे, दत्ता ठमके आणि अनंता मसने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments