आ. विक्रांत पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक सिडको निर्मल भवन मुंबई येथे संपन्न झाली. अनेक महत्वपूर्ण व शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या ज्वलंत विषयावर विस्तृत चर्चा झाली. सिडको प्रशासनाने प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली. येणाऱ्या कालावधी मध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही काटीबद्ध असल्याचे आ. विक्रांत पाटील यांनी सांगितले. या बैठकीत मा. कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, JMD शंतनू गोयल यांच्यासह प्रमुख सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0 Comments