रसायनी:- कामगार नेते
अशोक भाऊ मुंढे फाउंडेशन व रसायनी पातळगंगा माथाडी जनरल कामगार संघटना यांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत चांभार्ली चे मा. सरपंच व कामगार नेते अशोक भाऊ मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Bpcl कंपनीसमोर युनियनच्या नामफलकाचे अनावरण, राजाश्रय वृद्धाश्रमात अल्पोपहार वाटप, रसायनिक पातळंगा माथाडी व जनरल कामगार संघटना नवीन कार्यालयाचे उद्घाटन तसेच विविध क्षेत्रात नामलौकिक कमावणाऱ्या मान्यवरांचे सन्मान सत्कार व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मंडळींचा सन्मान सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जानेवारी कामगार नेते अशोक भाऊ मुंडे जन्मदिन अभिष्टचिंतन या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून माझ्या नवऱ्याची बायको आणि बिग बॉस फेम सिने अभिनेत्री रुचिरा जाधव, अभिनेत्री व नृत्यांगना वंदना पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती लागणार आहे. सोबतच मराठी व हिंदी गीतांचा नजराणा सुद्धा पाहायला मिळणार आहे. या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त खासदार श्रीरंग आप्पा बारणे, नामदार भरत शेठ गोगावले, महेंद्र शेठ घरत, प्रीतम दादा म्हात्रे , मा.आमदार मनोहर शेठ भोईर, आमदार प्रशांत दादा ठाकूर ,आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे
0 Comments