सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार पदापर्यंत; महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष

उरण(प्रतिनिधी):राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून समाजकारणाची वाट निवडणारे आमदार महेश बालदी हे उरण विधानसभा मतदारसंघातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार असा राजकीय प्रवासआपल्या जिद्द, संघटनशक्ती आणि लोकसेवेच्या बळावर घडविला.
सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि लोकहिताच्या कामांमुळे ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर उरण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहर विकासाला नवी दिशा दिली. पुढे जेएनपीटी विश्वस्त, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी पक्षसंघटना अधिक मजबूत केली आणि अखेरीस उरण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून जनतेचा विश्वास संपादन केला. 
आमदार म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या १२.५ टक्के विकसित जमिनीचा प्रश्न, मच्छीमार बंदर, स्थानिक युवकांना रोजगार, कंटेनर वाहतूक समस्यांवर उपाय, आदिवासी विकास, रस्ते काँक्रीटीकरण, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आणि विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. 
राज्य व केंद्र शासनातील वरिष्ठ स्तरावर समन्वय साधून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्याला गती देणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचा उल्लेख केला जातो. सर्वधर्म समभावाची भूमिका जपत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध तसेच सर्व समाजघटकांच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते नियमित सहभागी होत असतात. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांमध्ये त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.
 उरण, पनवेल आणि खालापूर परिसरातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची नोंद घेतली जाते. सामान्य कार्यकर्त्यापासून नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार असा त्यांचा प्रवास हा लोकसेवा, संघर्ष आणि विकासनिष्ठ नेतृत्वाचे उदाहरण मानला जातो. १७ जुलै रोजी असलेल्या त्यांच्या जन्मदिनानिमित्त उरण, पनवेल, खालापूरसह रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments