पुढे त्यांनी शुभेच्छा पत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासाचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी या पत्रात म्हंटले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन वेळा संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करताना शेतकरी, श्रमिक आणि स्थानिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली व अनेक प्रश्नांचे पालकत्व घेऊन ते मार्गी लावले. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नसून "माणसं जोडण्याची कला" आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात हातावर पेट असलेल्या असंख्य कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा समाजकार्यासाठी अर्पण करणारा त्यांचा दानशूर स्वभाव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ आहे. 'रयत' शिक्षण संस्थेशी आणि कर्मवीरांच्या विचारांशी जोडलेली त्यांची नाळ, आदिवासी व मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेली शैक्षणिक पायाभूत सुविधा, 'रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'सारखी क्रीडासंरचना, तसेच साहित्य-कला क्षेत्राला भक्कम आधार देणारे त्यांच्या विविध उपक्रमांचे जाळे, हे सर्व त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टीचे द्योतक आहे. समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांची व्यापक सामाजिक दृष्टी दिसून येते असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. तसेच, 'रामपर्व' हा ग्रंथ केवळ वाचनाचा आनंद देणारा चरित्रग्रंथ न राहता नेतृत्व, प्रामाणिकपणा, सेवाभाव, पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण म्हणून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून या ग्रंथाच्या निर्मितीत योगदान देणारे लेखक, संपादक, संशोधक आणि प्रकाशक यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
0 Comments