पनवेल (प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय या महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये घरोघरी जाऊन प्रचाराची धडाकेबाज मोहीम राबवली.शनिवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार चरणदीप बळदेव सिंग, प्रदीप गजानन भगत आणि नीलम मयूर मोहिते यांनी प्रभागातील विविध सोसायट्यांमध्ये भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या प्रचार दौऱ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधताना प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरी मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत ठोस आश्वासन दिले.
या शक्तीप्रदर्शनात पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका अरुणा भगत, कल्पना ठाकूर, वर्षा ठाकूर, मयूर मोहिते, अमोल सैद, स्वाती कोळी, ज्योती रायबोले, ललिता इनकर, पंकज बाबर, पंढरीनाथ साळुंखे, कविता माने, सुनील यमगर, सुयोग कारपे, तेजस इनकर, सतीश चाके, फातिमा आलम खाला यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात महायुतीने पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत प्रभाग ११ मधील मतदारांचा कौल आपल्या बाजूने असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
0 Comments