या करारनाम्यानुसार सर्व कामगारांना ८००० रुपये पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच एक ग्रॉस पगार अधिक २५०० रुपये बोनस, ओव्हरटाईम ग्रॉस पगारावर, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी तसेच स्थानिक बदली कामगारांना भरतीवेळी किमान २१००० रुपये पगार देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या कराराचे वैशिष्ठ म्हणजे सिनियर व ज्युनियर कामगारांच्या पगारात असणारा फरक काढण्यासाठी ज्युनियर कामगारांना तब्बल ९००० रुपये अतिरीक्त पगारवाढ तसेच नवीन ५ कामगारांना या व्यतिरिक्त ५०० रुपये पगारात वाढ अशा प्रकारे एकूण तब्बल १७५०० रुपयांची पगारवाढ करण्याचा ऐतिहासिक करार करण्यात राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यशस्वी झाले आहेत. या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील तर अदानी व्हेंचर्स तर्फे श्री. संदीप काळे (सिनियर मॅनेजर HR&IR) विष्कर एन्टरप्रायजेस चे डायरेक्टर श्री. विलास ठाकूर, श्री. अविनाश ठाकूर, (मॅनेजींग डायरेक्टर) श्री. सिद्धार्थ एडके (एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर) कामगारांतर्फे गजानन ठाकूर, सज्जन ठाकूर, रमेश ठाकूर, प्रवीण पाटील, जगदिश घरत आदी उपस्थित होते. या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
0 Comments