पनवेल (प्रतिनिधी): येत्या १५ तारखेला होणाऱ्या मतदानातून पुढील पाच वर्षांसाठी आपला प्रभाग कोणत्या दिशेने जाणार, याचा कौल जनता देणार आहे. देशप्रेम आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, भारतीय जनता पार्टीने कोणताही पक्षपातीपणा न करता प्रत्येक प्रभागात विकासकामे करून दाखवली आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या सांगतेवेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या संकल्पनेतून शहरी भागासह ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प भाजपने केला असून, विकासाचा वेग अविरत ठेवण्यासाठी येत्या १५ तारखेला कमळ निशाणीसमोरील बटण दाबून भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
या बाईक रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीचे उमेदवार काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रविंद्र खानावकर आणि कृष्णा पाटील सहभागी झाले होते. ही रॅली नावडे कॉलनी येथून सुरू होऊन नावडे गाव, पेंधर, नागझरी, ढोंगऱ्याचा पाडा, पाटीलवाडी, देवीचा पाडा, पाले खुर्द असा मार्गक्रमण करत तोंडेरे येथे सांगता झाली.रॅलीमध्ये महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या माध्यमातून उमेदवारांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मिश्रा, प्रदेश सचिव अॅड. इंदू दुबे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा, नारायणशेठ पाटील, वासुदेव पाटील, एकनाथ देशेकर, अशोक साळुंखे, कालुराम फडके, प्रकाश खैरे, बाळाराम पाटील, शुभ पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments