पनवेल (प्रतिनिधी) :गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय शंकर साठे यांचे आज (दि. ९) वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि तीन मुली, असा परिवार आहे.दत्तात्रेय साठे यांनी रसायनी येथील एचओसी कंपनीमध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. गावात त्यांना आदराने ‘आप्पा’ या नावाने ओळखले जात होते.त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून, उत्तरकार्य बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी गुळसुंदे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.
0 Comments