भाजप महायुतीचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील - नामदार पंकजाताई मुंडे

पनवेल (प्रतिनिधी) मोठा उत्साह असतो त्याठिकाणी नेत्याच्या येण्याने नाही तर कार्यकर्त्याच्या मेहनतीने विजय मिळतो त्यामुळे पनवेल महापालिकेत कार्यकर्त्याच्या कष्टाने भाजप महायुतीचे उमेदवार मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कळंबोली येथे केले. राज्यात महायुतीच्या शासनाने विकासाची गंगा ही तळागाळापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळेच मी मुंबईतून अल्पावधीतच अटलसेतूने पनवेलमधील येऊ शकले.महायुतीचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून आपले लाडके देवा भाऊ लाडक्या बहिणीसाठी ही चांगल्या योजना अमलात आणून काम करीत आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा जीव हा भाजपच्या कमळात होता म्हणून त्यांचे भगवानगडांमधील स्मारकही कमळात आहे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना आठवणी या कायम जर जपायचे असतील तर महायुतीच्या सर्व उमेदवारांना कळंबोलीसह पनवेल मधील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती आपण जपूया असे भावनिक आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. कळंबोलीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोली मध्ये रॅली व चौक सभा मोठ्या जल्लोषात पार पडली. त्यावेळी झालेल्या चौक सभेत त्या बोलत होत्या. या ठिकाणी मोठा उत्साह बघायला मिळाले असून महिलांची उपस्थिती मोठी पाहून आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा उल्लेख करत, मला या ठिकाणी येण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सातत्याने आग्रहाचे निमंत्रण असते, असेही अधोरेखित केले.  
 प्रचाराची रॅली कळंबोली मधून फिरून अखेरीस रोडपाली येथील बस स्टॉप च्या मैदानावर प्रचार रॅलीच्या सभेचे आयोजन हे करण्यात आले होते या रॅलीला मतदारांनी भरघोस भरभरून प्रतिसाद दिला.या वेळी भाजपा महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या रॅली दरम्यान महायुतीचे प्रभाग क्र. ०७ अमर अरुण पाटील, मनाली अमर ठाकूर, पाटील प्रमिला रविनाथ, राजेंद्रकुमार दिपचंद शर्मा, प्रभाग क्र. ०८ बबन नामदेव मुकादम, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक, रामदास वामन शेवाळे, प्रभाग क्र. ०९ महादेव जोमा मध्ये, दमयंती निलेश भोईर, ॲड. प्रतिभा सुभाष भोईर, शशिकांत शनिवार शेळके, प्रभाग क्र. १० रविंद्र अनंता भगत, मोनिका प्रकाश महानवर , सरस्वती नरेश काथारा, विजय मनोहर खानावकर या उमेदवारांचा नामदार पंकजा मुंडे यांनी आवर्जून उल्लेख करून या सर्वांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपला मतदानाचा हक्क बजावून भाजप महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आहे.राज्यात विकासाची गंगा आणणारे देवभाऊ, एकनाथजी शिंदे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा पनवेलमध्ये विकास साधणारे महापालिकेमध्ये आपले उमेदवार निवडून यावेत तरच पनवेलचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. पनवेल हे जागतिक दर्जाचे शहर होण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणून पनवेल मध्ये ही केंद्रात राज्यातील सत्तेप्रमाणे महायुतीची सत्ता आणावी असेही आवाहन यावेळी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांसमोर केले. 

(पंकजाताईंच्या उपस्थितीने समाजाला बळ – आमदार प्रशांत ठाकूर)
नामदार पंकजाताई मुंडे या स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक वारसाही समर्थपणे पुढे नेत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातील समाज वास्तव्यास असून पंकजाताईंच्या उपस्थितीमुळे चैतन्य निर्माण होऊन समाजाला नवे बळ मिळाले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचल्या असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. केवळ योजना राबवण्यातच नव्हे, तर महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक विकासात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम, सर्वाइकल कॅन्सर लसीकरण, आरोग्य केंद्रांची उभारणी यासारख्या योजनांमुळे महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. पनवेल महापालिका ही सर्वाधिक आरोग्य केंद्रे असलेली महापालिका ठरल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात विकासाचा वेग आणखी वाढावा यासाठी महायुतीच्या नेत्यांचे पाठबळ व आशीर्वाद आवश्यक असल्याचे सांगत, पंकजाताईंच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेऊन सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments