पनवेल मनपा निवडणूक २०२६: प्रभाग १७ मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अॅड. प्रकाश बिनेदार (अ), डॉ. अस्मिता घरत (ब), अॅड. शिवानी घरत (क) आणि अॅड. मनोज भुजबळ (ड) हे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.प्रभागात आतापर्यंत झालेल्या विविध विकासकामांची माहिती देत कार्यकर्ते आणि उमेदवार मतदारांशी संवाद साधत असून, नागरिकांकडून या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान घोषणाबाजी, नागरिकांचा सहभाग आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळत असून संपूर्ण प्रभाग क्रमांक १७ भाजपमहायुतीमय वातावरणात दुमदुमून गेला आहे.विशेष म्हणजे, प्रभाग १७ मधील उमेदवारांपैकी डॉ. अस्मिता घरत या वैद्यकीय क्षेत्रातील असून, तर प्रकाश बिनेदार, शिवानी घरत आणि मनोज भुजबळ हे तिघेही विधी तज्ज्ञ आहेत. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत उच्च शिक्षित आणि अनुभव असलेले उमेदवार मतदारांसमोर दिले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.याच कारणामुळे सुज्ञ मतदारांकडून या उमेदवारांचे स्वागत होत असून, विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना प्रभागात दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments