पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाकूर कुटुंबीयांचा मतदानाचा उत्साह

पनवेल (प्रतिनिधी) :पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या निवडणुकीत शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत ठाकूर कुटुंबीयांनी मतदारांना मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सकाळी शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात त्यांनी मतदान केल्याने परिसरात सकारात्मक संदेश गेला. यावेळी त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.पनवेल शहराच्या विकासासाठी योग्य नेतृत्व निवडणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ठाकूर कुटुंबीयांच्या मतदानामुळे कार्यकर्त्यांमध्ये व समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, ही निवडणूक पनवेलच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments