पनवेल (प्रतिनीधी ): जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर-महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ आणि शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडत आहे.स्पर्धेचे उद्घाटन चांगु काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष प्रो. डॉ. एस. के. पाटील तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुंबई शहर झोन-१चे सचिव डॉ. मनोज वर्मा, स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक आणि स्पर्धा सह-सचिव मा. पूनम मुजावर यांची उपस्थिती लाभली.या वर्षीच्या हँडबॉल स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून १२ मुलांचे संघ आणि १० मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर, प्रा. प्रतिज्ञा पाटील तसेच जिमखाना विभागातील सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयीचा उत्साह वाढावा, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
0 Comments