उलवे, ता. ११ : रसायनी तालुक्यातील कांबे गावात ह.भ.प. विठ्ठल माया म्हात्रे आणि ह.भ.प. वसंत माया म्हात्रे, तसेच योगेश विठ्ठल म्हात्रे यांच्या घराला रविवारी (ता. ७) शार्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आगीची घटना समजताच सामाजिक बांधिलकी जपणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. ९) तातडीने घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.म्हात्रे कुटुंबीयांच्या घराचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे म्हात्रे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
म्हात्रे कुटुंबाच्या घराची पाहाणी केल्यानंतर महेंद्रशेठ घरत म्हणाले, "कांबा येथील म्हात्रे कुटुंबाच्या राहत्या घराला लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. म्हात्रे यांचे कुटुंबीय वारकरी आहेत. अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर बेतलेला प्रसंग बाका आहे. सुदैवाने परमेश्वराच्या कृपेमुळे हे कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले नाही, ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करणे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे."त्यानंतर तातडीने महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी (ता. १०) म्हात्रे कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केली. यावेळी ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे, राम कुरंगळे, खालापूर तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल डवळे, डॉ. संजय कुरंगळे, विनायक डवळे, शैलेश कुरंगळे, समाधान म्हात्रे, के. डी. म्हात्रे, नितीन म्हात्रे, दिनकर म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, नयन म्हात्रे, नरेश म्हात्रे, अतुल कुरंगळे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कांबे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments