तळोजा MIDC: तळोजा औद्योगिक परिसर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आनंद हॉस्पिटल, MIDC तळोजा येथे विविध निदान चाचण्यांची सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड व महाधन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या सहकार्याने, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.या सेवेचा लाभ देवीचापाडा, ढोंगऱ्याचापाडा, खु. खैरणे , घोट, तोंडरे कानपोली, पडघे ,वावंजा, नावडे ,नितळस उसाटणे, तळोजा मजकुर, वळवली, वलप, शिरवली, आंबे, मोहदर, कुत्तरपाडा,खाणाचा बंगला, कोलवडी, पाले बु. हेदुटणे, पेंधर, नागझरी, महाळुंगी,खैरवाडी, येलमार ,फणसवाडी करंबेली, मोर्बे ,नेवाली टेंभोडे चिध्रंण खिडूकपाडा, भल्यांचीवाडी, चींचवली या गावांतील नागरिकांना मिळणार आहे.चाचणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अथवा वैद्यकीय रेफरल तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणताही रहिवासी पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. ही सेवा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपलब्ध राहणार असून रविवारी सेवा बंद असेल.आनंद हॉस्पिटलमध्ये हिमोग्लोबिन (HB), एक्स-रे, ईसीजी तसेच अल्ट्रासोनोग्राफी या सेवा अल्प दरात उपलब्ध आहेत. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये पोटातील अवयव, KUB (किडनी, युरेटर, ब्लॅडर), मान, थायरॉइड, पेरिअनल आणि इतर अवयवांचे स्थानिक भाग तपासले जाणार आहेत. मात्र गर्भधारणेसंबंधित एनेमली स्कॅन, ग्रोथ स्कॅन, ऑब्स्टेट्रिक स्कॅन आणि डॉपलर तपासणी या सेवा योजनेत समाविष्ट नाहीत. या योजनेविषयी अधिक माहिती किंवा अपॉईंटमेंटसाठी आनंद हॉस्पिटल, तळोजा MIDC रोड, पनवेल येथे संपर्क साधता येईल.
फोन नंबर : 8692008840, 8867137051,9324757141
आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्यामुळे तळोजा MIDC व आसपासच्या गावांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
0 Comments