इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+क्रेडिट कार्ड लाँचइंधन खर्चात मोठी बचत – लाइफस्टाइल रिवॉर्ड्सची जोड

पनवेल (प्रतिनिधी)इंडसइंड बँक आणि जिओ-बीपी यांनी संयुक्तपणे ‘इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड’ लाँच केल्याची घोषणा आज केली. इंडसइंड बँकेचे पहिले इंधन-केंद्रित कार्ड आणि जिओ-बीपीचे पहिले सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड म्हणून ही ऑफरिंग बाजारपेठेत सादर करण्यात आली असून, देशातील ‘ऑन-द-गो’ ग्राहकांना अधिक फायदेशीर, सोयीस्कर आणि रिवॉर्ड-समृद्ध अनुभव देण्याच्या उद्देशाने हे कार्ड डिझाइन करण्यात आले आहे.
रुपे नेटवर्कद्वारे समर्थित हे नवे मोबिलिटीप्लस क्रेडिट कार्ड जिओ-बीपीच्या २०५० पेक्षा अधिक मोबिलिटी स्टेशन्सवर उपलब्ध असलेल्या फ्युएल रिवॉर्ड्ससह प्रीमियम लाइफस्टाइल बेनिफिट्स आणि यूपीआय-आधारित पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे ही ऑफरिंग आपल्या प्रकारातील अत्याधुनिक आणि अनोखी ठरते.रुपे-आधारित यूपीआय व्यवहारांसह अखंड, जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट अशा सुविधा आणि खरेदीवर रिवॉर्डचे फायदे उपलब्ध करण्यात आले आहेत. इंडसइंड बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राजीव आनंद यांनी सांगितले कि, जिओ-बीपीसोबतची भागीदारी आमच्या ग्राहक-केंद्रित नवकल्पनांचे प्रतीक आहे. हे कार्ड आधुनिक, गतिमान ग्राहकांसाठी स्मार्ट आणि फायदेशीर मोबिलिटी अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. जिओ-बीपीचे चेअरमन सार्थक बेहुरिया म्हणाले, आमचा उद्देश आहे ग्राहकांचा प्रवास अधिक सोयीस्कर, रिवॉर्ड-समृद्ध आणि डिजिटल-चालित बनवणे. हे क्रेडिट कार्ड त्याच दिशेने एक पाऊल आहे. जिओ-बीपीचे सीईओ अक्षय वाधवा यांनी म्हंटले की, या कार्डद्वारे ग्राहकांना दरवर्षी ६० लिटरपर्यंत मोफत इंधनाचे मूल्य मिळू शकते आणि जिओ-बीपीवर प्रत्येक फ्युएलिंगवर ४. २५ टक्के पर्यंत मूल्य परतावा मिळतो. यूपीआय सुविधा आणि अॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी फ्युएल्समुळे हा अनुभव अधिक भविष्यवादी बनतो.

Post a Comment

0 Comments