पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "श्रीमद भगवद गीता पठण" स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी विभागनिहाय पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे.लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. सकाळी ९ ते दुपारी वाजेपर्यंत होणारी हि प्राथमिक फेरी शालेय आणि खुला अशा दोन गटात होणार आहे. शालेय गट फेरी पनवेल मधील लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, नवीन पनवेल येथे सीकेटी विद्यालय, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल तर खुला गटातील फेरी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धा प्रथम प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा टप्प्यांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
0 Comments