पनवेल (प्रतिनिधी ) श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख आदी उपस्थित राहणार आहेत.शनिवार दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेलच्या मार्केटयार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे समारंभ संपन्न होणार आहे.या सोहळ्यात लोकनेते माजी खासदार यांनी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सत्कार तसेच साहित्यिकांचा सत्कार आणि कवी संमेलन संपन्न होणार आहे.सहभागी कवींना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह आयोजकांच्यावतीने दिले जाणार आहे. या सोहळ्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले आहे.
0 Comments