पनवेल (प्रतिनीधी):भारताच्या संविधान स्वीकृती दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आज (२६ नोव्हेंबर) संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पुर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनेश ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाने झाली. यावेळी भूपेंद्र पाटील यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
0 Comments