पनवेल(प्रतिनिधी) खांदा कॉलनी येथील सुभाष भोईर यांची कन्या सानिया भोईर हिला वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. हा धनादेश मंडळाचे संस्थापक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते (दि. ११) सुपूर्द करण्यात आला.सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. सानिया भोईर हि एमबीबीएस हे वैद्यकीय शिक्षण एमजीएम महाविद्यालयात घेत असून तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हा मंडळाचा नेहमीचा उद्देश राहिला आहे, त्यानुसार हि मदत करण्यात आली. सदरचा धनादेश सानियाची आई प्रतिभा भोईर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर बधे, नामदेव घरत, मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी उपस्थित होते.
0 Comments