कुस्ती स्पर्धेत सीकेटी कॉलेजची प्रशंसनीय कामगिरी....

पनवेल (प्रतिनिधी) : सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद प्राप्त केले. त्याचबरोबर स्पर्धेत रितिका कारंडे(७२ किलो खालील) सुवर्ण पदक, समीक्षा बोरगे (६२ किलो खालील) रजत पदक, आदित्य पांडा(९७ किलो खालील) कांस्य पदक, नवीन डोंगरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, समृद्धी जाधव(५५ किलो खालील) कांस्य पदक , अस्मिता मोरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, दिशा घनवट (७६ किलो खालील) कांस्य पदक आणि दीपश्री म्हात्रे (७६ किलो खालील) कांस्य पदक या प्रमाणे पदक प्राप्त करून सांघिक द्वितीय विजेते पद मिळवले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, कुस्ती प्रशिक्षक श्री. रूपेश पावशे यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्ध्यांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.


Post a Comment

0 Comments