पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित ‘दिवाळी पहाट’ अर्थात सुश्राव्य संगीत मैफिल पनवेलमध्ये मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व लोकप्रिय गायिका बेेला शेंडे आपल्या सुमधुर आवाजात विविध सुश्राव्य गीतांची मैफल सादर करणार आहेत. दीपावलीच्या आनंददायी वातावरणात बेला शेंडे यांच्या स्वरांची जादू अनुभवण्याची संधी पनवेलकरांना मिळणार आहे.यंदाचे हे ‘दिवाळी पहाट’ चे ९ वे वर्ष असून, गेल्या काही वर्षांपासून पनवेलकरांसाठी ही संगीताची सकाळ एक अविस्मरणीय परंपरा बनली आहे. त्यामुळे संगीताच्या माधुर्याने आणि दिवाळीच्या मंगलमय वातावरणाने पनवेल शहर उजळून निघणार आहे.या कार्यक्रमासाठी पनवेल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments