पनवेलमध्ये दीपोत्सव उत्साहात

पनवेल (प्रतिनिधी) मिडलक्लास हौसिंग सोसायटी ही विविध उपक्रमांचे केंद्र बनत आहेत, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर दीपोत्सवाच्या उदघाटनावेळी काढले. दिवाळीच्या मंगलमय स्वागतासाठी पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते. पनवेलकरांसाठी हा सोहळा मनोरंजन, इतिहास आणि समाज एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.या दिमाखदार कार्यक्रमाचा शुभारंभ डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या हस्ते आणि पनवेल मतदार संघाचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती झाला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ही भेट देऊन आयोजकांना व उपस्थितांना शुभेच्छा देऊन प्रसिद्ध वक्ते सुदर्शन शिंदे यांच्या व्यख्यानाचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते, नेत्रदीपक आकर्षक फायरवर्क्स आणि लाईट शो. या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि दिवाळीच्या उत्साहाला एक खास रंगत आली. विविध रंगांच्या आणि आकारांच्या दिव्यांची सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे एक मनमोहक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते.सांस्कृतिक मनोरंजनासोबतच वैचारिक मेजवानी देण्यासाठी कार्यक्रमात शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध वक्ते सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवरायांचे पराक्रम, त्यांचे गडकोट व्यवस्थापन आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यावर त्यांनी विचार मांडले. या व्याख्यानाने उपस्थितांना गौरवशाली स्मृतींचा अनुभव मिळाला. या यशस्वी आयोजनामागे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, एम.सी.सी.एच. सोसायटीचे अध्यक्ष आणि उद्योजक राजु गुप्ते, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे पनवेल शहरध्यक्ष सुमित झुंजारराव यांची अथक मेहनत होती. दीपोत्सवाच्या निमित्ताने पनवेलकरांना दिवाळीच्या आनंदासोबतच इतिहास आणि समाज एकात्मतेची भावना अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, डॉक्टर सुहास हळदीपूरकर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपनेते जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, अनुराधा ठोकळ, रुचिता लोंढे, सारिका भगत, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव उद्योगपती राजू गुप्ते, विलास कोठारी, मंगेश परुळेकर, मिलिंद पोटे, शहर उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, प्रभाग क्रमांक अध्यक्ष पवन सोनी, संजय जैन, प्रशांत शेटे, प्रवीण मोरबाळे, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments