इनरव्हील क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर; ७७ रक्तदात्यांचे रक्तदान

पनवेल (प्रतिनिधी) : इनरव्हील क्लब पनवेल डिस्ट्रिक्ट ३१३ च्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केईएम ब्लड बँक, पनवेल रोटरी क्लब, कळंबोली रोटरी क्लब, गुरुकुल एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट आणि साई संस्कार स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन या सर्वांच्या सक्रिय सहकार्य व सहभागाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध स्तरांतून शिबिराचे कौतुक होत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत इनरव्हील संस्था सातत्याने समाजहिताचे उपक्रम राबवत असून, हे रक्तदान शिबिर त्याचेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Post a Comment

0 Comments