पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेलच्या सदस्यांनी तळोजा मध्यवर्ती कारागृहाला तेथील वाचलायनासाठी पुस्तके भेट दिली तसेच पोलीस व कैदी बांधवांना राखी बांधली. बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देत या उपक्रमातून कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कैद्यांना प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली व त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तके दान करण्यात आली. तळोजा कारागृहातील सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडावा यासाठी सहकार्य केले.
0 Comments