चिंचवली गावातील शेकापचे निष्ठावंत व कार्यसमर्थ युवा नेतृत्व महेश महादु पाटील यांची दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.या प्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिलदादा सोणावळे, एपीएमसी सचिव प्रकाशजी नाईक, एपीएमसी मार्केट पनवेलचे संचालक ह.भ.प. बाळकृष्णशेठ पाटील, संचालक दिनेश महाडिक, संचालक महादु पाटील, तसेच देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच व एपीएमसी संचालक देवा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडीमुळे महेश पाटील यांच्यावर स्थानिक पातळीवरील विश्वास आणि त्यांचे सामाजिक कार्य अधोरेखित झाले आहे त्यांना पुढील कार्यकाळासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments