पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा" या उपक्रमाअंतर्गत उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा येथे शाळा अंतर्गत फेरी अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भाषण सादर करत आपल्या विचारांची प्रभावी मांडणी केली. स्पर्धेतील विषयांमध्ये माझं स्वप्न, शिकल्यामुळे काय फरक पडतो, जर मी जादूगार असतो, शिक्षणाचं महत्त्व, इंटरनेट – वरदान की शाप?, प्लास्टिक मुक्त भारत, मोबाईल नसते तर? अशा रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनांचा समावेश होता. या फेरीतून प्रत्येक इयत्तेमधून ३ विद्यार्थी निवडून ते पुढील आंतरशालेय फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण झाली असून, भाषिक कौशल्यासह त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागला आहे. कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून राबवले जाणारे हे वक्तृत्व स्पर्धा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.या स्पर्धेच्या आयोजनासाठी शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन सत्रे घेतली.
कोट-
आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची सकारात्मक भावना निर्माण होते. ही स्पर्धा संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यासपीठावरील सादरीकरण यामध्ये भर घालते.
- मुख्याध्यापक मुक्ता खटावकर
0 Comments