सामाजिक कार्यातून आनंद मिळतो - लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) पैसा महत्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्वाच आहे. त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छता दूतांना रेनकोट आणि टिफिन बॉक्स वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले.पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामजिक उपक्रम राबण्यात येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारतीय जनता युवामोर्चा प्रभाग क्रमांक १४ यांच्यावतीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजवाणाऱ्या स्वच्छता दूतांसाठी रेनकोट व टिफीन वाटपाचा कार्यक्रम सोमवारी पनवेल शहरातील बावन बंगला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला असून त्यांनी स्वच्छता दूतांना रेनकोट आणि टिफीन बॉक्सचे वाटप केले. या कार्यक्रमाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, मुकीत काझी, माजी नगरसेविका सारिका भगत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, शहर सरचिटणसि अमित ओझे, रुपेश नागवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रशांत शेट्टे, गणेश म्हात्रे, शुभम कांबळे, उज्वला पाटील, प्रभाग १४ चे युनीयन अध्यक्ष शरद कांबळे, ओमकार सुर्वे, ओमकार डाकी, वास्तव चव्हाण, स्वयम चव्हाण, नील ठक्कर, मैत्रेय जोशी, विकास टाक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments