लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित नवीन पनवेल मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी)नवीन पनवेल मध्ये कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिचसो औचित्यसाधून विविध कामांचे लोकार्पण, आयुष्यमान भारत कार्ड वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या माध्यामतून रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन लाभार्थीना कार्डचे आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी केले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ३ लाख रुपयांच्या निधीमधून राम मंदिर येथे उभारण्यात आलेल्या हाय मास्टचे आणि कंटेनर टॉयलेटचे लोकार्पण माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर १३ लाख ५८ रुपयांच्या निधीमधून करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे आणि ४ लाख रुपयांच्या निधीमधून शंकर मंदिर येथे लावण्यात आलेल्या ब्युटीपीकेशन लाईटचे लोकार्पण माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. 
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी उपस्थित राहून कार्डचे आणि वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, सुशीला घरत, राजश्री वावेकर, वर्षा नाईक, ज्येष्ठनेते सी.सी. भगत, सुधाकर थवई कामगार नेते रवींद्र नाईक, भाजपनेते जितेंद्र वाघमारे, विनोद वाघमारे, पुष्पलता मढवी, जनार्दन पाटील, विजय म्हात्रे, अक्षय तांबोळी, भालचंद्र वाघमारे, योगेश हाडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments