काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सर्व कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता श्रुती म्हात्रे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ पक्ष श्रेष्टीनी श्रुती म्हात्रे यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या व वयक्तिक स्वार्थ न बघता समाजहीत, पक्ष हित डोळ्यासमोर ठेऊन नेहमी कार्यरत असणाऱ्या व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक संप आंदोलन, मोर्चा बैठका मध्ये नेहमी सहभागी होणाऱ्या व अन्याया विरोधात नेहमी आवाज उठविणाऱ्या, गोर गरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रुती म्हात्रे यांची निवड काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी झाल्याने काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण असून काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. श्रुती म्हात्रे यांचे सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजकार्य आणि पक्षनिष्ठेच्या जोरावर राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या श्रुती शाम म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली या जबाबदारीसह त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात आणखी बळकटी आणण्याची संधी प्राप्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे युवक, महिला आणि समाजातील विविध घटकांमध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.
0 Comments