सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी

पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशाने पनवेल महानगरपालिका आणि कोशिश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९. ३० वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज होती. त्या नुसार विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५" वक्तृत्व स्पर्धेत वर्ग आणि शाळा अंतर्गत फेरीत उत्तम तयारीसह विचार मांडले. त्यामुळे हि स्पर्धा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची उत्तम संधी मिळाली. वर्ग आणि शाळा अंतर्गत फेरीत विद्यार्थ्यांनी सादर केलेले विषय अतिशय वैविध्यपूर्ण आणि महत्वपूर्ण होते. प्रत्येक भाषणात त्यांच्या कल्पकतेचा आणि विचारशक्तीचा सुंदर आविष्कार दिसून आला. त्या अनुषंगाने हि वक्तृत्व स्पर्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, चांगु काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल (इंग्रजी माध्यम), चांगु काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल (मराठी माध्यम), सुषमा पाटील विद्यालय कामोठे, लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय कामोठे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्बी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारघर, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, केएसए बार्न्स स्कूल, पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ०१ ते ११ शाळा आदी शाळांचा सहभाग मिळाला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एकूण १६,८८७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि ४०५ वर्गांमधून निवड झालेल्या २०२५ विद्यार्थी शाळा अंतर्गत फेरीसाठी अर्थात दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. यामधून पात्र ठरलेले विद्यार्थी सोमवारी होणाऱ्या महाअंतिम फेरीत आपले वक्तृत्व कौशल्य सादर करणार आहेत. 

Post a Comment

0 Comments