पनवेल (प्रतिनिधी )नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीबाबत काही अनावश्यक आक्षेप नोंदवले जात आहेत. या संदर्भात ठाम विश्वास आहे की केंद्र सरकार विमानतळ सुरू होण्यापूर्वीच नामकरणाचा निर्णय घेईल. या चळवळीला केंद्र सरकारकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि स्थानिकांची भावना सन्मानाने मान्य केली जाईल. हेही लक्षात ठेवले पाहिजे की, आज आक्षेप घेणारे लोक त्यावेळी आंदोलनाला पाठिंबा देत नव्हते, जेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या नामकरण चळवळीला मारक ठरणारा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात ते मौन बाळगत होते, हे सर्व जनतेला माहीत आहे. याशिवाय, या संदर्भातील समितीचे अध्यक्ष हे तटस्थ असणे अपेक्षित असताना त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश बालदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. बालदी यांनी या नामकरणासाठी झालेल्या सर्व आंदोलने उर्जेने पुढे नेली, अगदी त्यासाठी त्यांना खटलेसुद्धा भोगावे लागले. अशा व्यक्तीच्या प्रयत्नांना नाकारणे आणि त्यांच्या विरोधात भूमिका घेणे हा सरळसरळ राजकीय हेतू आहे.
कोट
- लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि जनतेची भावना लक्षात घेऊन हा विमानतळ त्यांच्याच नावाने होणार, यात कोणतीही शंका नाही. हे नामकरण केवळ एका पक्षाचे वा नेत्याचे नसून, संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या भावनांचा आणि जनतेच्या हक्कांचा विषय आहे.
– प्रशांत ठाकूर
आमदार, भाजप – पनवेल विधानसभा
0 Comments