स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा

पनवेल(प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडलाच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.यावेळी तिरंगा हातात घेऊन भारतमातेच्या जयघोषात संपूर्ण शहर देशभक्तीच्या वातावरणाने न्हाऊन निघाले.यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून झाली. पुढे आदर्श हॉटेल, विरुपाक्ष मंदिर, जय भारत नाका, टिळक रोड अशा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे यात्रेचा समारोप झाला. संपूर्ण मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. यात्रेदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “जय हिंद”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. पनवेलकर नागरिकांमध्ये देशभक्तीची ऊर्जा आणि एकात्मतेची भावना जागवणारा हा सोहळा अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला.
या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, पनवेल मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, वर्षा ठाकूर, महिला मोर्चा अध्यक्ष्य रुचिता लोंढे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, तेजस कांडपिळे, सुनील बहिरा, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, हेमलता म्हात्रे, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, नीता माळी, सुलोचना कल्याणकर, नलिनी शेलार, संजय जैन, अमरीश मोकल, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विनायक मुंबईकर, स्वप्नील ठाकूर, के.सी.पाटील, रोहित जगताप, स्वाती कोळी, लीना पाटील, कोमल कोळी, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशभक्ती व एकात्मतेचा संदेश दिला. तसेच, नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आणि राष्ट्रहितासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले. हातात तिरंगा झेंडा, जवानांच्या गौरवार्थ अभिमान फलक, ढोलताशाचा गजर, देशभक्तीच्या घोषणा भव्य तिरंगा यात्रा ही पनवेलकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. भाजप पनवेल शहर मंडलाच्या या तिरंगा यात्रेने पनवेलकर नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ केली. उपस्थितांच्या मनात ही यात्रा एक अभिमानाचा व अविस्मरणीय सोहळा म्हणून कायम राहणार आहे.

Post a Comment

0 Comments