पनवेल (प्रतिनिधी) श्री स.स. बाळकृष्ण माऊली चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आणि गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे श्री क्षेत्र नंदेश्वर येथे संपन्न झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री तीर्थ क्षेत्र नंदेश्वर साठी २१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या प्रसंगी श्री स.स. बाळकृष्ण माऊली यांच्या पादुका पूजन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शन घेतले. या कार्यक्रमात काकड आरती, श्री ची नित्य पूजा, सुस्वर संगीत भजन, माऊलींच्या पादुकांचे पूजन, सांप्रदायिक भजन आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. हा सर्व सोहळा श्री स.स. बाळकृष्ण माऊली अध्यात्मज्ञान मंदिर, श्री क्षेत्र नंदेश्वर सोलापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री क्षेत्र नंदेश्वरचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल पंचायत समितीच्या आजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, सरपंच विजेंद्र पाटील, वीरेंद्र म्हात्रे, रमण ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, कल्पना ठाकूर, चंद्रभागा ठाकूर, राधाताई ठाकूर, अरुण घरत, जी. के. ठाकूर, श्रीधर ठाकूर, स्नेहलता ठाकूर, हिरालाल ठाकूर, नामदेव ठाकूर, आप्पा पांचाल, किसन मुकुल, अनिल कोळी, प्रशांत कोळी, शिवू महाराज, सागर ठाकूर, नारायण ठाकूर, ज्योती ठाकूर, मीनाक्षी पाटील, देव सागर साधक समाज, इंचगिरी संप्रदाय न्हावा, न्हावा खाडी, गव्हाण, कोपर, शिवाजी नगर, येथील भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमात माउली नवनाथ म्हात्रे आणि दीपाली म्हात्रे यांनी २ लाख ५० हजार, वर्षाताई घोडके यांनी २ लाख, कैलासवासी लक्ष्मण ठाकूर आणि कैलासवासी महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ राधाताई ठाकूर व अहिल्या ठाकूर यांच्याकडून १ लाख ११ हजार १११, यश मारिन सर्व्हिसेस यांच्याकडून १ लाख, ११ हजार १११, कैलासवासी लक्ष्मण जोमा नाखवा आणि कैलासवासी जिजाबाई नाखवा यांच्या स्मरणार्थ गव्हाण कोळी परिवार तर्फे ५१ हजार, कान्हाशेठ ठाकूर यांच्याकडून १ लाख, कैलासवासी हसुराम ठाकूर यांच्या समरणार्थ श्रीधर हसुराम ठाकूर यांच्याकडून ५१ हजार, कैलासवसी बाबू ठाकूर यांच्या स्मरणार्थ इंदिरा ठाकूर यांच्यावतीने ५१ हजार, कैलासवासी विनायक कोळी यांच्या स्मरणार्थ लीलाबाई कोळी यांनी ५५ हजार, चंद्रभागा घरत यांनी ५१ हजार, कैलासवासी देवकुबाई ठाकूर यांच्या स्मरणार्थ दशरथ ठाकूर यांच्या वतीने ५१ हजार, सखाराम कदम यांनी १ लाख, बंडोपंत डोंगरे यांनी १ लाख, नागजी लोखंडे यांनी १ लाख, नंदाताई डोंगरे यांनी १ लाख, कैलासवासी समीर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गुलाब म्हात्रे यांच्याकडून ५१ हजार, नानासाहेब फिस्के यांच्या वतीने १ लाख रुपयांची रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
0 Comments