पनवेल (प्रतिनिधी) कोणताही पक्ष भेद न मानता काम केले की पक्ष वाढतो त्यामुळेच भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणत वाढली आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी केले. पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतीत बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या स्वनिधीतून आंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठनेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या इमारतीचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्या इंदुमती पाटील, ग्राम सुधारणा मंडळा सचिव कर्णीक पाटील, भाजपनेते अरुण घरत, बेलपाडा गाव अध्यक्ष संतोष म्हात्रे, जे. डी. ठाकूर, वसंत म्हात्रे, गणेश पाटील, नामदेव पाटील, जगदीश पाटील, किरण म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, अशोक घरत, प्रवीण म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, अंकुश पाटील, नाथा घरत, तुकाराम ठाकूर, अतिश पाटील, प्रकाश कडु, पंकज पाटील, अशोक पाटील, मधुकर म्हात्रे, मनोहर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments