ईशान्य फाउंडेशन च्या सीएसआर निधीतून वळवली शाळेच कायापालट... कामगार नेते प्रकाश म्हात्रे

पनवेल (साबीर शेख): रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी येथील वर्ष भर विविध लोकउपयोगी उपक्रम राबवणारी कंपनी दीपक फर्टीलायझरच्या ईशान्य फाउंडेशनच्या सीएसआर निधी मधून विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले .यावेळेस कंपनीचे एचआर हेड नीरज अगरवाल यांच्या हस्ते तसेच कामगार नेते प्रकाश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे लोकार्पण करण्यात आले . या कार्यक्रमास कंपनीमधील अधिकारी वर्ग वसंत वीरकर ,संदीप काकडे, योगेश पाटील, माजी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, माजी सरपंच दिलीप पाटील, अनिल पालेकर ,हरिश्चंद्र पेटकर, विश्वास पेटकर यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष दत्ता पाटील, माजी अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे, मारुती पाटील, कोंडीराम पालेकर, जगदीश पालेकर, डॉ.शैलेश वाडेकर तसेच व्यवस्थापन शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
२३ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात प्राथमिक शाळा वळवली साठी प्रार्थना हॉल ,तीन एलईडी टीव्ही देऊन शाळेचे डिजिटलायजेशन केले. मागील वर्षी शाळेच्या इमारतीचे दुरुस्ती करून बांधकाम पुनर्जीवत केले. अशा विविध कामासाठी मदत व सहकार्याचे नियोजन श्रेय हे दीपक फर्टीलायझर व ईशान्य फाउंडेशनच्या वतीने होत असल्याने शालेय शिक्षण व्यवस्थेत सुंदर ,नियोजन बद्ध दर्जात्मक पद्धतीने बदल होत आहे. अत्यंत गरजेच्या ठिकाणी महत्त्वाचे उचलेले हे पाऊल सुविधा देणारे असल्याचे समाधान ऋणी मनाने कामगार नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त करत सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे महिलांच्या साठी भाकरी यंत्र, तसेच उपजीविका स्टॉल, व्यावसायिक वापरासाठी डि फ्रिजर अशा एक ना अनेक ५० लाखांची विकास कामे गावामध्ये करण्यात आली असल्याचेही सांगितले या निमित्ताने आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. त्यामध्ये दहा जणांचे मोतीबिंदू तर १०० हून अधिक लोकांचे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले .त्यातील उपचारासाठी अल्प दरामध्ये चिकित्सा करण्यात येणार असल्याचे नियोजन ही करण्यात आले. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट आयोजित शिबिरासाठी ईशान्य फाउंडेशनने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून या संपूर्ण सहकार्यामुळे वळवली गावाचा सुंदर नियोजनबद्ध कायापालट होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी देत सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments