पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या वर्षी एकूण १६,८८७ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला, त्यातून २०२५ विद्यार्थ्यांची शाळा अंतर्गत फेरीसाठी निवड झाली आहे. त्या अनुषंगाने आज नवीन पनवेल मधील सी. के. ठाकूर विद्यालय येथे शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पार पडली. या ठिकाणी १५० विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले, त्यातून ३० विद्यार्थ्यांची अंतरशालेय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी ‘माझं स्वप्न’, ‘शिक्षणाचं महत्त्व’, ‘स्वच्छ भारत’, ‘प्लास्टिक मुक्त भारत’ अशा विविध विषयांवर उत्तम तयारीनिशी भाषण दिले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य व नेतृत्वगुण विकसित होत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील व पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळत आहे, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे. कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा जिंकण्याचे नव्हे तर आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे महत्व शिकवले आहे. यामुळे शाळा पातळीवरूनच उद्याचे सक्षम नेतृत्व घडवण्याचे कार्य होत आहे.
कोट-
कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वकृत्व स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट रित्या संपन्न झाली. चांगु काना ठाकूर मराठी माध्यम माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धकांनी जिद्दीने आपले विचार मांडले जे प्रशंसनीय आहे. विविध विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण प्रभावी होते . सर्व स्पर्धकांनी उत्तम तयारी केली होती व सहभाग दिला, हे विशेष कौतुक . या स्पर्धेमुळे नव्या वक्तांना व त्यांना घडण्याची संधी मिळाली . हा उपक्रम अतिशय सुज्ञ व प्रेरणादायी होता यातून नवोदितांना व्यासपीठ मिळाले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अभिव्यक्तीची कला आणि विचारशक्ती विकसित होईल.यासाठी आयोजकांचे विशेष धन्यवाद.
- परीक्षक स्वाती पाटील - सहाय्यक शिक्षिका चांगु काना ठाकूर माध्यम व उच्च माध्यम विद्यालय ,नवीन पनवेल
0 Comments