
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहुबाई शेख यांच्या हस्ते समाधान म्हात्रे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात समाधान म्हात्रे यांना अधिकृतरित्या नियुक्तीपत्र देण्यात आले. उरण तालुक्यातील गोवठणे गावचे सुपुत्र असलेले समाधान म्हात्रे हे सुरुवातीपासूनच पक्षाचे कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.या अगोदर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस स्वर्गीय कै.प्रशांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत होते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात समाधान म्हात्रे हे नेहमी सहभागी होत असतात. पक्षाची ध्येय धोरणे पक्षाचे कार्य व विचार तळागाळात पोचविण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत एक निष्ठेने व प्रामाणिकपणे केले आहे.ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.अभ्यासु व प्रेमळ व्यक्तिमत्व असल्याने नागरिकांच्या,जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे.समाधान म्हात्रे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांचे खंदे समर्थक आहेत.समाधान म्हात्रे यांनी आजपर्यंत पक्षासाठी दिलेले योगदान,पक्षाप्रती असलेली तळमळ, त्यांचे कार्य विचार लक्षात घेता त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्यासह पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रायगड जिल्ह्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने समाधान म्हात्रे यांनी सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
0 Comments