पनवेल (प्रतिनिधी) सध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित होऊन स्वतः ते आत्मसात केले पाहिजे, असे मत चाणक्य मंडल परिवाराचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ. भूषण केळकर यांनी सीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिरावेळी व्यक्त केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. 9) खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर आणि रोजगारविषयक वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून या हे सत्र घेण्यात आले होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, ए.सी.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंगचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पवार, सेंट. विल्फ्रेड कॉलेज ऑफ इंजिनिरिंगचे प्राचार्य डॉ. मनीष शर्मा, भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजच्या प्राचार्य सानवी देशमुख, आरटीसीसीएस सिनिअर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. महेश्वरी झिरपे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य निशा नायर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रा. एस.एस. कांबळे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, रोहित जगताप, देवांशु प्रभाळे, डॉ. आर.व्ही. येवले, ए.व्ही. पाटील, ट्रेनिंग अधिकारी आरती कागवडे यांच्यासह महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments