कामोठेत शिवशाही सेना व पश्चिम महाराष्ट्र सेवा संघ आयोजित जागतिक महिला दिन साजरा....

शिवशाही सेना तसेच पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी दि (९ मार्च) रोजी कामोठे वसाहतीमधील सेक्टर ३६ येथील जगतगुरु संत तुकाराम मंदिर शेजारी महिला शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. शिवलीला ताई पाटील यांचे किर्तन व समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता . महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय
कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी 8 मार्च दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.  
शिवशाही सेना आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम संघाच्या अध्यक्ष राजकुमार पाटील करत असतात.यावेळी या कार्यक्रमात कोकण म्हाडाचे मा. सभापती बाळासाहेब पाटील, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, मा. आमदार बाळाराम पाटील, पमपा मा. नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, समाजसेविका मोहिनी ताई पाटील, समाजसेविका स्नेहलताई ढमाले, समाजसेविका नीलिमाताई आंधळे,विद्या मोहिते, आदी मान्यवर व  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments