चौक विभागातर्फे आमदार महेश बालदी यांचा सत्कार...


चौक / प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघात सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले आमदार महेश बालदी यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम चौक येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या कार्यालयाच्या आवारात खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी आयोजित केला होता.  यावेळी अनेकांनी आमदारांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. या कार्यक्रमात भाजप खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी तालुक्याच्या वतीने आमदार महेश बालदी यांचा सत्कार केला. चौक नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच रितू ठोंबरे यांनीही ग्रामपंचायत सदस्यांसह पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास भाजप नेते विनोद भोईर, अभिजित देशमुख, उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, विठ्ठल मोरे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सुरेखा जमदाडे व कार्यकारिणी, तालुका उपाध्यक्ष अरुण पारठे, सदस्य सुरेश सकपाळ, आरपीआयचे तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, तुलसीदास डोंगरे, बोरगाव सरपंच प्रितेश मोरे, तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार, वडगाव उपसरपंच विश्‍वनाथ पाटील, चौक उपसरपंच सुभाष पवार, बूथ प्रमुख प्रदीप जाधव, युवा मोर्चाचे दर्शन पोळेकर, अवधूत करमरकर, रोहित पंदेकर, रणजीत खंडागळे, रमेश मुंढे, रवी पाटील, समीर देवघरे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच चौक परिसरात बेरोजगारांसाठी मेळाव्याचे आयोजन करून प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन केले आहे. आपल्या विश्‍वासाला तडा जाणार नाही याची दक्षता मी घेईन.
- महेश बालदी, आमदार

Post a Comment

0 Comments