आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतले आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

प्रतिनिधि/कर्जत 
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सहकुटुंब रेवदंडा येथे जाऊन प्रसिद्ध समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांचे शुभ आशीर्वाद घेतले.यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत नगरसेवक संकेत भासे, मनोहर थोरवे व त्यांचा परिवार उपस्थित होता.आमदार थोरवे यांनी कर्जत-खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन व सामर्थ्याची विनंती केली. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी व नागरिकांच्या भल्यासाठी आशीर्वाद लाभावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, समाजाच्या हितासाठी निःस्वार्थीपणे कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.या भेटीदरम्यान आमदार थोरवे यांनी मतदारसंघातील विकासकामांबद्दल संवाद साधला व सर्व घटकांना बरोबर घेऊन प्रगतीचे नवे मापदंड उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments