एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल म्हणाले की, "नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी थेट सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना यूएईसाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. आमच्या दुहेरी विमानतळ धोरणात नवी मुंबई विमानतळाची महत्त्वाची भूमिका असून, या भागीदारीतून भविष्यात आणखी व्यापक हवाई संपर्क निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."
अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत २३ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावर दररोज सुमारे १५० हवाई वाहतूक हालचाली होत आहेत.पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाद्वारे नाशवंत वस्तूंच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय निर्यात मालवाहतुकीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेलाही नवी दिशा मिळणार आहे.अबू धाबी हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिला आंतरराष्ट्रीय मार्ग असून, लवकरच आणखी अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्ये या जाळ्यात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतूक क्षमतेला बळ मिळण्यासह भारताच्या आंतरराष्ट्रीय संपर्क, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे
0 Comments